खळ`ळं .......... आणि कळत की काचेचा चक्काचूर झालाय
स्वप्नं बनून जे काही डोळ्यात चमकत होतं तेच आता थेंबा थेंबाने धो धो वाहतंय पहा
स्वप्नं आपण रंगवायची, त्यांची घर आपण बांधायची, अपेक्षांची तोरणं आपण सजवायची
पण ते ओरबाडून, खरवडून टाकतं कोणी तरी अनोळखी व्यक्ती
त्या व्यक्तीचा ना आपण द्वेष केला, जरी त्याने केला असेल आपल्या वर्णाचा
त्या व्यक्तीचा न आपण कधी राग धरला, पण त्याने धरला असेल आपल्या देशाचा
त्या व्यक्तीबद्दल न कधी आपण वाईट बोललो, पण त्याने घातल्या असतील आपल्याला मनसोक्त शिव्या
त्या व्यक्तीचा न आपल्याला नावही माहित, आणि त्यालाही नक्कीच माहित नसणार आपलं
मग कोणी हक्क दिला त्याला हे ठरवण्याचा कि माझं आयुष्य आज इथेच संपणार आहे,
मग त्याला का वाटले असावे कि आपल्या मनाच्या निष्कलंक काचेचे असे हजार तुकडे करून, आपल्या आप्तांच्या डोळ्यात टोचवावे
मग त्याला अशी इच्छा का व्हावी कि ज्या व्यक्तीचे नाव त्याला माहित नाही, त्याचे नाव या जगाच्या पाटीवरून पुसून टाकावे.
हा हक्क दिला त्याला माणुसकीच्या अभावाने, अहंकाराच्या खोट्या हातोडीने जी हाणून त्याने आपले हे सुंदर काचेचे स्वप्नं असे उध्वस्त केले ........... खळ`ळं