मन जसे एक छोटेसे पाखरू ..... आकाराचे बंधन तोडून आकाशाला गवसणी घालते
पंखांची ताकद संपून जाते ..... तरी उत्साहाच्या जोरावर भरारी घेते
मन जशी एक मोहरती वेल .......सौंदर्याने फुलू पाहते
तिच्या सुंदरतेची खरी ओळख ..... तिच्या अधावृक्षाने होते
मन जशी एक उधाण लाट ..... समुद्राच्या गहिराइतुन जन्म घेते
खळखळत किनाऱ्यापाशी येते ...... अन शांत होऊन वाळूत मिसळते
मन जसे मंद वाहणारा वारा ....... प्रसन्नता पसरवतो
सुगंधी फुलांचा सहवास मिळवून ....... वातावरण मोहरवतो
मन जसे मोकळे आकाश .... निळाईने स्वच्छं धुतलेलं
ढगांचे मळभ पुसून टाकून ..... निळ्या रंगाने रंगलेलं
मन जसे पतंगाचा मांजा ....... फिर्कीतून सुटून गगनाकडे धावतो
पण जरी मोकळा होऊ पाहतो......फिर्कीशी नातं धरून बसतो
मन जसे एक शिम्प्ल्याचे कवच ..... अश्रुंचे कानही जपून ठेवते
पण भावनेच्या समुद्रतळाशी ...... या अश्रुंचे मोती फुलवते......