किती गोष्टी असतात ना अशा, ज्या मनाच्या कपाटात एका चोर कप्प्यात लपवून ठेवलेल्या असतात !
खरतर आपणही विसरून गेलेलो असतो या गोष्टींबद्दल, पण त्यांचं असणं मात्र असताच, अगदी अपरिहार्य!
हळुवार पणे उघडून पाहूया! काय काय असेल हो त्यात?
कोणाबद्दल राग तर कोणाबद्दल अनुराग!
एखाद्याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणाची धूसफूस, एखाद्या सॉलिड वाटलेल्या व्यक्तीबद्दलची कुजबुज
एखादा मोकळ्या मनाने गडबडा लोळून हसवणारा क्षण, तर एखादा एकटाच ढसाढसा रडताना गळलेल्या अश्रूंचा कण
कधीतरी जुन्या मित्राला खूप वर्षांनी भेटल्यावर केलेलं आश्चर्याच hi !
तर कधी एखाद्या जिवलग मैत्रिणीला निरोप देताना खोटा हसत केलेलं रडवेला bye!
खूप राग येऊन भावाशी केलेली जोरदार मारामारी , तर कधी चूक नसतानाही मनवायला म्हटलेलं हलक sorry!
कुणाचीतरी उगाच आलेली आठवण, नाहीतर विसरायला हवी अशी हुंदक्यांची साठवण.
एखाद्या पिक्चर मधला एखादा झकास stylish dialogue, नाहीतर एखाद्या विचारवंताच्या नाटकातला अंतर्मुख करणारा monologue.
कुणाचीतरी उगाच आलेली आठवण, नाहीतर विसरायला हवी अशी हुंदक्यांची साठवण.
एखाद्या पिक्चर मधला एखादा झकास stylish dialogue, नाहीतर एखाद्या विचारवंताच्या नाटकातला अंतर्मुख करणारा monologue.
पटकन आवडलेल्या आणि लक्षात राहिलेल्या काही चारोळ्या , तर कधी मोर्च्यातल्या लोकांच्या, मनाला भिडलेल्या आरोळ्या
नाही म्हणता म्हणता केवढा काय काय आठवलं , आत्ता कळला इतके वर्ष काय साठवलं !
कधी मारा एक फेर फटका आपल्याच मनात, आणि जाणून घ्या कुठल्या गोष्टी खरच भावल्या होत्या , नाहीतर बाहेरचं मन आहेच जे डोक्याच्या बरोबर गोष्टींचे दोनच वर्ग करतं, व्यवहारोपयोगी त्या खऱ्या आणि बाकी सर्व खोट्या!
good one!!
ReplyDeletemanat fer fatka marlya sarkha watla....baryach chan an bhauk goshti chatkan umaglya....
Ekdam chan!!
Awesome...hi bakichya blogs peksha bhari ahe...saral sopi...kharach manat dokavnyachi iccha jhali...kudos...keep it up :)
ReplyDelete